Sharmila Thackeray On Amit Thackeray : "हा विचार मराठी माणसाने केला पाहिजे" अमित ठाकरेंवरील गुन्ह्यावर शर्मिला ठाकरेंची पडखर प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले म्हणून अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला यावर शर्मिला ठाकरे यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली आली आहे.
Sharmila Thackeray On Amit Thackeray : "हा विचार मराठी माणसाने केला पाहिजे" अमित ठाकरेंवरील गुन्ह्यावर शर्मिला ठाकरेंची पडखर प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर, नवी मुंबईच्या नेरुळमध्ये कपड्याने झाकून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यामुळे नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर अमित ठाकरेंवर दाखल केलेल्या गुन्ह्यावर ठाकरे कुटुंबांकडून प्रतिक्रिया देण्यात आली. तसेच अमित ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलेल्या कृतीसाठी समर्थन दाखवले आहे.

याविषयी आधी अमित ठाकरेंचे भाऊ आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देत म्हटल की, शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या काही महिन्यांपासून घाणेरड्या कापडाने झाकून ठेवला होता. त्याचे अनावरण करून अमितने तर त्या पुतळ्याचा सन्मान राखला, तरी देखील त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते आज प्रभादेवी येथे नव्याने सुरु झालेल्या एका कॅफेचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी माध्यमांशी बोलताना अमित ठाकरेंच्या आई शर्मिला ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. 1800 कोटींचा जामीन घोटाळा होतो, पण गुन्हा दाखल होत नाही… आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले म्हणून अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल होतो. असं म्हणत शर्मिला ठाकरेंनी पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यावर प्रतिक्रिया दिली.

यावेळी शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, "मला अभिमान आहे, खूप अभिमान आहे. मी वाट बघतेय माझ्यावर कधी केस होते. तो पुतळा मातीने माखलेला होता. मी तुम्हाला खरं सांगू का, यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज आठवतात. जसं आता शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर तुम्ही नमो सेंटर उभारणार आहेत. आधीपासूनच महाराष्ट्र सरकारची टुरिस्टरिजम सेंटर आहेत, जी सरकारी आहेत ती तुम्ही पुन्हा सुरु करा ना. तिथे छत्रपतींपेक्षा मोठी कोणाची नाव आहेत का ? तसं तरी सांगा.. त्यांच्यापेक्षा आम्ही मोठे आहोत आम्ही आमची नाव देणार."पंतप्रधान तिथं येऊन गेले, पण त्यांना वेळ शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी वेळ मिळाला नसेल." असं म्हणत शर्मिला ठाकरेंनी लेकावर दाखल झालेल्या गुन्हावर पडखर प्रतिक्रिया दिली". 

तसेच पुढे बिहारमधील निवडणुकांच्या निकालावर आणि मनपा निवडणुकीवर बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, हा विचार मराठी माणसाने केला पाहिजे. त्यांच्या संकटात कोण त्यांच्या पाठीशी उभं असत ते पाहून त्यांनी मतदान केलं पाहिजे. असं शर्मिला ठाकरेंनी म्हटलं आहे. 

हेही वाचा- "हा विचार मराठी माणसाने केला पाहिजे" अमित ठाकरेंवरील गुन्ह्यावर शर्मिला ठाकरेंची पडखर प्रतिक्रिया

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version