मराठा आरक्षणाबाबत महत्वाची बैठक

मराठा आरक्षणाबाबत महत्वाची बैठक

कोल्हापूर: मराठा आरक्षणाबाबत आक्रमक झालेल्या संभाजीराजे यांनी कोल्हापुरात सोमवारी महत्वाची बैठक बोलावली आहे.विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले असून संभाजीराजे पुढील लढ्याची दिशा मांडण्याची शक्यता आहे.

२७ मेपर्यंतचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिल्यानंतर संभाजीराजे राज्यभरातील मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.शिवाजी मंदिरात सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे.त्यामुळे या बैठकीत ते काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version