Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आंदोलनावर ठाम; 58 लाख नोंदीवरून जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा, नेमकं काय घडतयं?

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आंदोलनावर ठाम; 58 लाख नोंदीवरून जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा, नेमकं काय घडतयं?

अंतरवाली सराटी : तुम्ही आम्हाला 58 लाख नोंदी दिल्या आहेत. आम्ही म्हणतो आता तुम्ही आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या. तुम्ही तलाठी, ग्रामसेवक आणि तत्सम अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र द्यायला सांगा. यादी लावायला सांगा, अशी अटच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाकडे ठेवली आहे. राज्याचे मंत्री शंभुराज देसाई, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि प्रसाद लाड हे अंतरवली सराटीत आले आहेत. मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करत आहेत. या चर्चेच्यावेळी जरांगे यांनी ही मागणी केली आहे. मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. 29 ऑगस्टपासून उपोषणाचं हत्यार ते उपसणार आहेत. याचदरम्यान त्यांच्याकडून सरकारवर चौफैर टीकास्त्र सोडण्यात आलं. जरांगे यांची आक्रमक भूमिका आणि या आंदोलनाचं काउंटडाऊन सुरू झालेलं असताना नेत्यांची धावाधाव सुरू झाली. जरांगे यांच्या भेटीसाठी आज दुपारी सरकारचं शिष्ट मंडळ अंतरवाली सराटीत दाखल झालं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराजे देसाई, आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्याशी चर्चा सुरू असून 58 लाख नोंदीवरून जरांगे सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत आहेत.

हेही वाचा : Pune Accident : भीषण अपघात! धावत्या बसमधून तोड जाऊन पडल्याने तरुणीचा मृत्यू; सिंहगड रोडवरील घटना

शिष्टमंडळ-किती दिवस चर्चा करणार आहे, सरकार चर्चा करतं आणि अवमान पण करतंय. तुम्हाला अजून मराठा समाजाकडून अपेक्षित काय आहे. 58 लाख नोंदी देणं सरकारचं कर्तव्य आहे. आम्ही मराठ्यांना वेड्यात काढतो, हा सरकारचा गैरसमज आहे. शिष्टमंडळ आणि सरकारने गैरसमाजातून बाहेर पडावे, आता आम्ही वेळ देण्याच्या मनस्थितीत नाही. शिष्टमंडळ काय चर्चा करणार आहे. मराठ्यांचा रोष यांना कमी करायचा आहे. मराठ्यांच्या पुढे आता सरकार उघडं पडलं आहे, आता त्यांना सुट्टी नाही. 29 ऑगस्टला आंदोलन करणारच असल्याचे सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. अंतरवालीच्या आंदोलनात सरकारने डाव टाकला, पण आता 29 ऑगस्टच्या आंदोलनात तसं केलं तर पुढचं आंदोलन मुंबईत, वर्षा बंगल्यावर आहे. फडणवीस यांना विरोध करणार नाहीत. त्यांना खोलीत अडचण होत असली तर स्लॅबवर बसून आंदोलन करू, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version