Manoj Jarange Patil : "आज भाऊ संकटात आहे, ताईकडे…", जेवणाच्या आमंत्रणानंतर जरांगेंचं अमृता फडणवीस यांना उत्तर; नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नागपुरातील एका कार्यक्रमात उपस्थित असताना त्यांना मनोज जरांगे पाटील यांना वक्तव्यावर जेवायला येण्याचे आमंत्रण दिलं होत.
Manoj Jarange Patil : "आज भाऊ संकटात आहे, ताईकडे…", जेवणाच्या आमंत्रणानंतर जरांगेंचं अमृता फडणवीस यांना उत्तर; नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नागपुरातील एका कार्यक्रमात उपस्थित असताना त्यांना मनोज जरांगे पाटील यांना वक्तव्यावर जेवायला येण्याचे आमंत्रण दिलं होत. अमृता फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्याची चर्चा राज्यभर रंगली. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी मुंबईत येण्याबाबत विधान केले होते. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलं होत की, ‘मनोज जरांगे पाटीलजी हे माझे भाऊ आहेत. आणि मी त्यांना घरी जेवायला यायला निमंत्रण देते.’

त्यांच्या या आमंत्रणावर आता मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन येतो, असं सांगत जरांगेंनी अमृता फडणवीसांचं आमंत्रण स्वीकारलं आहे. एकीकडे मराठ्यांचे आंदोलन संपविण्यासाठी नियोजन केले जात आहे, पण मी मागे हटणार नाही असा प्रण जरांगेंनी घेतलाय. तर दुसरीकडे जरांगे आणि अमृता फडणवीस यांच्यातील भावा-बहिणीच्या नात्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा- Shivsena Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला ठाकरेसेनेकडून वेग! 40 मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती; कोणत्या नेत्याला कुठली जबाबदारी

यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, “अमृता ताईंनी सांगितलं, तर भाऊबीजेच्या वेळी जेवायला जाऊ. सध्या आंदोलन सुरू आहे. आत्ताच्या वेळी बोलवू नये बहिणीने तेवढा तरी बारकाईने बघावं. आज मी लढाईच्या मैदानात आहे. आज लढायच्या मैदानात असताना जेवायला या म्हणाले तर मला हार पत्करावी लागेल. ते करून चालणार नाही. भाऊ संकटात असताना बहिणीने त्याला पाठिंबा द्यायला हवा. एखादी व्यक्ती चांगल्या भावनांनी काही बोलत असेल तर त्यावर प्रत्येक वेळी आडकाठी करू नये.”

“मायेची भावना ताईंनी आमच्या बाजूने ठेवावी. भाऊबीजेवेळी साडी चोळी घेऊन जातो. सध्या जेवण्याची वेळ नाही. शिकारीच्या वेळेला जेवण्याची वेळ नाही. आज भाऊ संकटात आहे. ताईकडे भाऊबीजेच्या वेळी साडी चोळी घेऊन जाणार. शिकारीच्या वेळी इकडे तिकडे जाणे योग्य नाही. त्यांनी भावाचे नाते सांगितले आहे तर मी त्यांच्याकडे भाऊबीजलाच जेवायला जाईन. सध्या मी गरिबांच्या लेकरांसाठी लढत आहे. अशावेळी मी जेवायला गेलो, तर कसं चालेल? त्यापेक्षा नंतर मी नक्कीच त्यांच्याकडे साडीचोळी घेऊ भाऊबीजेला जेवायला जाईन” असं म्हणत अमृता फडणवीसांच्या निमंत्रणाला आज जरांगे पाटील यांनी उत्तर दिले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version