Manoj Jarange Patil: दोन कोटींची आलिशान डिफेंडर कार कुणाची?; मनोज जरांगेंनी स्वतःच सांगितले…

Manoj Jarange Patil: दोन कोटींची आलिशान डिफेंडर कार कुणाची?; मनोज जरांगेंनी स्वतःच सांगितले…

सोलापूर : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील जसे त्यांच्या आंदोलनासाठी लोकप्रिय आहेत तसेच सध्या त्यांच्या डिफेंडर गाडीचीही तुफान चर्चा होत आहे. जरांगे फिरत असलेल्या दोन कोटींची डिफेंडर कार नेमकी कुणाची याचा उलगडा आता जरांगेनी स्वतःच केला आहे. मराठा आरक्षणासाठी गेली तीन चार वर्षे झटणारे, सरकारला आंदोलनाची ताकद दाखवून देणारे, प्रसंगी समाजातील नेत्यांच्या विरोधात जाऊन वंचितांच्या न्याय हक्कांसाठी सरकारला सळो की पळो करून सोडणारे मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूर, धाराशिवमधून त्यांनी आता पश्चिम महाराष्ट्रात पाऊल ठेवले आहेत. 

हेही वाचा : Shiv Sena Party Symbol Case : मोठी बातमी! कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सुनावणीत ट्विस्ट; पक्ष आणि चिन्ह ठाकरेंना मिळण्याच्या आशा पल्लवीत? नेमकं काय घडलं

डिफेंडर गाडीबद्दल मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाज फुगीर आहे, आमच्याकडे जर पाचशे रूपये असतील तर आम्ही वरच्या खिशात ठेवतो, का तर? लोकांना दिसावे म्हणून… आमच्याकडचे पैसे लपत नाहीत, माझ्याजवळ एक रूपया नाही, माझ्याजवळ कोणतीही गाडी नाही. फक्त मराठा समाजाला वाटते की गर्व वाटेल असे मनोज जरांगे आपल्या पोरा-बाळांसाठी काम करत आहेत. नोकरदार, व्यावसायिक, राजकीय वर्गाकडून जे होत नाही, ते काम आंदोलनाच्या माध्यमातून मी करत असेल तर समाजाचा पाठिंबा मला मिळणारच की.. आमच्याजवळ गाडी आहे, राहूद्या तुम्हाला फिरायला, असे लोक म्हणतात…

मी कोणत्याही गाडीत बसतो, इंडिकात बसतो, टेम्पोत बसतो, एसटीत बसतो कधी प्रचाराच्या गाडीतही बसतो आणि आत्ताच्या मोठ्या गाडीतही बसतो. मला तिचं नावही माहिती नाही, माझी गाडीच नाहीच ना ती… सुभाष भोसले नावाच्या कार्यकर्त्याची गाडी आहे. माझ्या बैठकीच्या ठिकाणी तो आला. मला देवाने भरपूर दिले आहे, ही गाडी माझी आहे, ती तुम्हाला फिरण्यासाठी राहू द्या, असे तो मला म्हणाला. अतिशय चांगली गाडी आहे पण माझ्या दौऱ्यात लोकांनी गाडीवर उड्या मारल्या, गाडीचे आता काहीसे नुकसान झाले आहे, आता त्याला कळेल मला गाडी दिल्यावर काय होते, असेही मिश्किलपणे जरांगे पाटील यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version