Manda Mhatre : ‘आता निर्णय घेणार, माझ्यावर सतत अन्याय झालायं’; मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेल्या मंदा म्हात्रे यांनी मांडली भूमिका

Manda Mhatre : ‘आता निर्णय घेणार, माझ्यावर सतत अन्याय झालायं’; मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेल्या मंदा म्हात्रे यांनी मांडली भूमिका

मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका कार्यक्रम पत्रिकेवरून निर्माण झालेला वाद आता अधिकच चिघळताना दिसत आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेल्या मंदा म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना कार्यक्रमाच्या आयोजनामागे हेतुपुरस्सर राजकारण झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की “मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी निधी मंजुरीबाबत कोणतीही भूमिका नसल्याचे सांगितले. त्यामुळे ही निमंत्रणपत्रिका जाणूनबुजून तयार करण्यात आली असावी. मला राजकीय त्रास देण्याचा हा प्रयत्न असू शकतो,” असे त्या म्हणाल्या. म्हात्रे यांनी कार्यक्रमस्थळी धक्काबुक्की झाल्याचाही आरोप केला आहे. “मी कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र तिथे गणेश नाईक समर्थक नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी माझ्यासोबत धक्काबुक्की केली. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तब्बल 17 वर्षे काम केले. पक्षाची पहिली महिला आघाडी अध्यक्षा होते. मात्र गणेश नाईक राष्ट्रवादीत आल्यानंतर माझ्यावर अन्याय होऊ लागला आणि अखेर मला पक्ष सोडावा लागला,” असा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा : Shiv Sena UBT Gat : शिवसेना उबाठा गटाला धक्का; पुण्यातील या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यानं दिला पदांचा राजीनामा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version