वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी: वीजदरात 10% तात्काळ कपात, घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा

राज्यात पहिल्यांदा वीजदरात मोठी कपात; MERC चा ऐतिहासिक निर्णय, 5 वर्षांत 26% दर कमी. घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना दिलासा.
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी: वीजदरात  10% तात्काळ कपात, घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा

Good News For Electricity Consumers: महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिलासादायक निर्णय जाहीर झाला आहे. वीजदरवाढीच्या नेहमीच्या प्रवाहाला छेद देत, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच वीजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) महावितरणच्या याचिकेवर निर्णय देताना, पहिल्या वर्षी 10 टक्के आणि पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने एकूण 26 टक्के दरवाढीची कपात जाहीर केली आहे. यामुळे घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे.

नेमकं काय म्हटलं आहे ट्विट मध्ये? 
राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे. त्यांच्यासाठी 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version