राज्यभरात रामनवमी उत्साहात…

राज्यभरात रामनवमी उत्साहात…

देशभरात आज रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अयोध्येसोबतच महाराष्ट्रातून अनेक ठिकाणी उत्साहात राम जन्मोत्सव साजरा केला जात आहे. नाशिकचे काळाराम मंदिर , नागपूरातील पोद्दारेश्वर मंदिर , पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर , साईंच्या शिर्डी तसेच प्रतिशिर्डीत आणि शेगावात ही रामनवमी उत्सव साजरा केला जात आहे.

पंढरपूर –

श्रीरामनवमी निमित्त विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात ५००० सफरचंदांनी सजवण्यात आला आहे. सफरचंदाच्या फळानी देवाचा मांडव सजवला आहे. शेवंतीच्या फुलांची सुंदर आणि मनमोहक आरास करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर सजल्याने देवाचे रूप मनमोहक दिसत आहे. पुण्यातील भक्त भरत यादव यांनी ही सेवा रामनवमी निमित्ताने केली आहे.

नाशिक –

राम जन्मोत्सव निमित्त नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात ही राम नवमी साजरी केली गेली. राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या हस्ते श्रीरामांचा अभिषेक केला गेला. त्यांच्यासोबत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ हे ही उपस्थित होते. यावेळी कोश्यारी आणि भुजबळ यांनी एकत्रित पूजा केली.

नागपूर  –

नागपूरचे ऐतिहासिक आणि धार्मिक वैभव असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये सकाळपासूनच भक्तांनी रामाच्या दर्शनाकरता गर्दी केली आहे. तर , संध्याकाळच्या वेळी मंदिराच्या बाहेर ११,००० दीप प्रज्वलित केले जाणार आहे.

शिर्डी –

शिर्डीत तीन दिवस साजरा होणाऱ्या रामनवमी उत्सवाचा आज चा तिसरा दिवस आणि मुख्य दिवस आहे. पहाटे काकड आरतीला सप्त नद्याच्या जलाने साईमुर्तीला जलाभिषेक करण्यात आला. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने  साई दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदीयाळी ही शिर्डीत दिसुन येत आहे.तसेच राम जन्मोत्सवासाठी शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. साईबाबांच्या मंदिरात आणि गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

शेगाव –

रामनवमी निमित्त बुलडाणा जिल्ह्यातील संत नगरी भाविकांनी फुलून गेली आहे. संत गजानन महाराज परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. दरवर्षी राज्यभरातून भाविक शेगावात दर्शनासाठी येत असतात. यंदाही भाविकांच्या गर्दीमुळे शेगावला जत्रेचे स्वरूप आले आहे.

राज्यभरातून राम जन्मोत्सवा साठीचा भाविकांचा उत्साह दिसून येत आहे. विविध फुलांच्या तसेच सफरचंदाच्या फळांनी केलेल्या आकर्षक सजावटींमुळे मंदिरं आता अधिकच मनमोहक दिसत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version