Sahar Sheikh : अखेर माफी मागितली…! MIM च्या सहर शेख नरमल्या, माफीनामा सादर

नंतर संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार या सहर शेख यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या.
Sahar Sheikh : अखेर माफी मागितली…! MIM च्या सहर शेख नरमल्या, माफीनामा सादर

“अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है,” या  विधानामुळे मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख अडचणीत आल्या आहेत. यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. भाषणा करतानाची त्यांची ‘कैसा हराया’ स्टाइल त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार या सहर शेख यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या.

त्यानंतर, माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सहर शेख यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट दिली. आता सहर शेख यांनी माफीनामा सादर केला आहे. 

काय लिहिलं आहे माफीनाम्यात?
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी किरीट सोमय्या यांना दिलेल्या लेखी अहवालात सहर शेख यांच्या माफीनाम्याचा उल्लेख केला आहे. शेख यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले की, “माझे वक्तव्य केवळ पक्षाच्या झेंड्याच्या रंगा संदर्भात (हिरवा रंग) होते. कोणाचेही मन दुखाण्याचा किंवा सामाजिक वातावरण बिघडवण्याचा माझा हेतू नव्हता. आम्ही तिरंग्यासाठी जगू आणि तिरंग्यासाठीच मरणार आहोत. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागते.”
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version