LPG Cylinder Rates: महिन्याच्या सुरुवातीलाच आनंदाची बातमी! एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात, मात्र…

डिसेंबरच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कपात झाली आहे.
LPG Cylinder Rates: महिन्याच्या सुरुवातीलाच आनंदाची बातमी! एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात, मात्र…

LPG Cylinder Rates: डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती बजेटला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजीच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतींमध्ये कपात जाहीर केली आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरचे नवे दर लागू होतात आणि यावेळीही त्या परंपरेनुसार किंमतीत बदल करण्यात आला. मात्र, ही कपात केवळ 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरवरच असून घरगुती ग्राहकांसाठी 14.2 किलोच्या सिलेंडरमध्ये कोणताही बदल झालेला नाही. देशातील अनेक शहरांमध्ये रेस्टॉरंट, हॉटेल आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत साधारण 10 रुपयांची घट करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यातही व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 5 रुपयांची घसरण झाली होती.

त्याआधी ऑक्टोबरमध्ये किंमती वाढवण्यात आल्या होत्या. म्हणजेच, व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींचे चढउतार सुरुच आहेत. घरगुती सिलेंडरबाबत मात्र एप्रिलनंतर कोणतीही बदल प्रक्रिया करण्यात आलेली नाही. नवीन दरांनुसार, इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार, दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आता 1,580.50 मध्ये मिळणार आहे. कोलकातामध्ये या सिलेंडरची किंमत 1,684 रुपयांची, तर मुंबईत किंमत कमी होऊन 1,531.50  झाली आहे.

हेही वाचा:Crime News: चोरांनी चोरीची हद्दच पार केली! रुग्णालयात मृताच्या अंगावरचे दागिने केले लंपास

दक्षिण भारतातील प्रमुख शहरांपैकी चेन्नईमध्ये या सिलेंडरचा नवीन दर 1,739.50 रुपये  इतका आहे. सर्व शहरांमध्ये नवे दर 1 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. किंमतीतील या घटीमुळे लहान-मोठ्या हॉटेल व्यवसायांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वापरासाठी एलपीजीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर लागते, त्यामुळे सिलेंडरचे दर कमी झाले की त्याचा थेट परिणाम खाद्य उद्योगावर दिसून येतो. तथापि, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नसल्याने सर्वसामान्य ग्राहकांना अद्याप आणखी दिलासा मिळालेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत उतार-चढाव सुरू आहेत. त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीवरही दिसून येतो.

हेही वाचा:Weather Update: महाराष्ट्र गारठणार! राज्यातील काही जिल्ह्यांत तापमानात मोठी घसरण; पुढील 48 तास महत्त्वाचे

व्यावसायिक सिलेंडरचे भाव महिन्याला बदलत असतात, तर घरगुती सिलेंडरच्या किमती तुलनेने कमी वेळा बदलल्या जातात. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक सिलेंडरचे दर कमी झाल्यामुळे उद्योग क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून येत्या काही महिन्यांत घरगुती सिलेंडरचे दर कमी होण्याची शक्यता आहे का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, देशभरात येणाऱ्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर राहतील का, किंवा आणखी काही मोठा बदल होईल का याचा निर्णय सध्या जागतिक तेलबाजारातील घडामोडींवर अवलंबून आहे. परंतु, डिसेंबर महिन्याची सुरुवात व्यावसायिक ग्राहकांसाठी समर्थनीय ठरली आहे, एवढे मात्र नक्की.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version