Kojagiri Purnima: कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्रप्रकाशात न्हालेली एक जादूई रात्र! ही रात्री चंद्र आपल्या पूर्ण तेजात असतो आणि त्याचे सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. या खास रात्रीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेक घरांमध्ये मसाला दूध पिण्याची परंपरा आहे. फक्त चवदारच नव्हे तर शरीरासाठी फायदेशीर असलेले हे दूध आरोग्यदायी सवयींपैकी एक मानले जाते.
चला तर मग, यावर्षी कोजागिरीला बाहेरून दूध न आणता घरीच बनवा एकदम खास मसाला दूध तेही अगदी पारंपरिक पण सध्याच्या काळात उपयुक्त अशा पद्धतीने.
हेही वाचा:Milk Boiling Tips: दूध कधीच उतू जाणार नाही; 'या' 5 सोप्या आणि उपयुक्त ट्रिक्स जाणून घ्या
साहित्य: मसाला दूधासाठी लागणारी सामग्री
¼ कप बदाम
¼ कप काजू
¼ कप पिस्ता
½ चमचा वेलची पावडर
काही केशर काड्या
साखर (आवडीनुसार)
1 लिटर दूध
मसाला पावडर तयार करण्याची पद्धत
सुकामेवा भाजणे:
एका कोरड्या कढईत मध्यम आचेवर बदाम, काजू आणि पिस्ता घालून सौम्यपणे भाजून घ्या. सुमारे 2 मिनिटे ढवळत भाजल्यावर गॅस बंद करा. लक्षात ठेवा, सुकामेवा जळू नये.
थंड करून ग्राइंडिंग:
भाजलेले ड्रायफ्रूट्स पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सर किंवा ब्लेंडरमध्ये टाकून बारीक पावडर करून घ्या. याच वेळी वेलची पावडर आणि केशरही यामध्ये मिसळा.
स्टोरेज:
ही तयार पावडर हवाबंद डब्यात भरून रेफ्रिजरेटरमध्ये साठवून ठेवा. ही पावडर महिनाभर टिकते आणि हव्या त्या वेळी वापरता येते.
मसाला दूध बनवण्याची पद्धत
1 लिटर दूध उकळून त्यात 2 ते 3 चमचे तयार केलेली मसाला पावडर घाला.
हवे असल्यास थोडीशी साखर किंवा गूळ घालू शकता.
दूध मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे उकळा, जेणेकरून सर्व घटक एकत्र मिसळतील.
दूध थोडं गरम असतानाच चंद्राला अर्पण करून नंतर प्राशन करा.
पोषणमूल्य आणि फायदे
हे मसाला दूध चविष्ट तर आहेच, पण त्यामध्ये असलेल्या बदाम, पिस्ता, केशर आणि वेलचीमुळे मेंदूला शक्ति, शरीराला उष्णता आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी हे दूध फायदेशीर आहे.
कोजागिरीचा खरा आनंद
कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात प्रियजनांसोबत बसून हे गरमागरम मसाला दूध प्यायल्याने उत्सवाला एक वेगळीच चव येते. यावर्षी घरीच ही खास रेसिपी ट्राय करा आणि आपल्या आरोग्यासाठी एक छोटं पण महत्त्वाचं पाऊल उचला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.