अभिनेता कार्तिक आर्यनवर कोसळला दुख:चा डोंगर

अभिनेता कार्तिक आर्यनवर कोसळला दुख:चा डोंगर

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कार्तिकच्या आजोबांचं निधन झाल्यानं. कार्तिक सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत कार्तिकने आपल्या आजोबांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली आहे. कार्तिक आर्यनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या आजोबांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो बालपणीचा असून फोटोमध्ये कार्तिक हा त्याच्या आजोबाच्या कडेवर दिसत आहे. या फोटोत कार्तिकचं वय अवघं एक- तीन वर्षांचं असल्याचं दिसत आहे. त्याच्या आजोबांनी सूट घातला आहे, तर कार्तिक आर्यन लाल स्वेटर आहे.

हा फोटो शेअर करत कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ”मी इच्छितो की, मीही तुझ्यासारखा होईन. तुमच्या आत्म्यास शांती लाभो नानू’. यासोबतच कार्तिकने हार्ट शेप इमोजीही यासोबत शेअर केला आहे. कार्तिकच्या या पोस्टवर त्याचे चाहते आणि मित्र त्याचं सांत्वन करत आहेत. तसंच कार्तिकच्या आजोबांच्या आत्म्याच्या शांती मिळावी यासाठी प्रार्थना करीत आहेत. कार्तिक आर्यन लवकरच ‘भूल भुलैया 2’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी, परेश रावल, राजपाल यादवही त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनीस बाझमी करत आहे. हा चित्रपट 2009मध्ये आलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा सिक्वल आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version