Sanjay Shirsat : "जयंत पाटलांचा निर्णय लवकरचं कळेल, आठ दिवसात…" जयंत पाटील यांच्या भेटीवर संजय शिरसाट यांचे मोठे विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी ‘वर्षा’ येथे भेट दिल्यानंतर सुरू झालेल्या चर्चांवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Shirsat : "जयंत पाटलांचा निर्णय लवकरचं कळेल, आठ दिवसात…" जयंत पाटील यांच्या भेटीवर संजय शिरसाट यांचे मोठे विधान

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून घडामोडींना वेग आला असून विविध राजकीय बैठका, पक्षांतराच्या चर्चा आणि आगामी राजकीय समीकरणांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावर बोलले आहेत. त्यांनी उपरोधिकपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्याशिवाय वर्षा बंगल्यावर जयंत पाटील बैठकीसाठी गेलेले. त्यावर राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

हेही वाचा- Gunratna Sadavarte: ‘सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा पुळका कशासाठी? स्वतः उपोषणाला बसा…’; गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी ‘वर्षा’ येथे भेट दिल्यानंतर सुरू झालेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना शिरसाट यांनी म्हटलं की, “वर्षावर बैठक झाली, पण राजकीय माहिती जोपर्यंत जयंत पाटील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देत नाही, तोपर्यंत सत्यता काहीच नाही. शरद पवार एनडीएसोबत चर्चा करत आहे. मी यापूर्वी केलेली काही भाकिते खरी ठरली आहेत. त्यामुळे पुढील आठ-दहा दिवसांत राज्याच्या राजकारणात काय घडते ते सर्वांना दिसेल. जयंत पाटील कोणता निर्णय घेतात हेही लवकरच स्पष्ट होईल. मात्र अशा निर्णयांचा अधिकार वरिष्ठ नेतृत्वाकडे असतो.”

पुढे उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावर बोलताना शिरसाट म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा विषय आहे, चांगला विषय आहे, त्यांनाच काय ध्येय आहे आपल्याला काही देणेघेणे नाही, ऑन हनुमान ,रामाची त्यांना आठवण झाल्या शुभेच्छा आहे नवनवीत राणा आरती करण्याचा प्रयत्न केला, सत्ता असताना अटक केली, जेलमध्ये ठेवले, आता यांच्यावर कारवाई केली तर,पण आम्ही कारवाई करणार नाही, भक्ती करण्यास बंधन नाही…राम मंदिर सोहळा निमंत्रण दिल्यावर हे आले नऊ, त्याच्यामुळे त्यांच्या निमंत्रण साठी त्यांनी आग्रह धरू नयेत, राजकीय कार्यक्रम त्यांनी करावे, सल्ले देण्याचे त्यांचे काम आहे, पण कोण ऐकत नाही, सल्लेमुळे यांना नागपूरला जावे लागत आहे.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version