जे. जे. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांचे राजीनामे

जे. जे. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांचे राजीनामे

मुंबई, १ जून २०२३, प्रतिनिधी :  जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता आपल्याला वर्षभरापासून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार राजीनामे देणाऱ्या सर्व वरिष्ठ डॉक्टरांची आहे. विशेष म्हणजे राजीनामा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये तात्याराव लहाने यांचे नाव असल्याने हे प्रकरण गंभीर असण्याची शक्यता आहे. डॉ. तात्याराव लहाने, रागिणी पारेख यांच्यासहित ९ जणांनी राजीनामे दिल्याचे सांगण्यात येत आहे. जे जे रुग्णलयातील ज्येष्ठ डॉक्टरांनी एक पत्रक जारी करत राजीनामा देण्यामागील कारण सांगितले आहे.

जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता आपल्याला वर्षभरापासून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार राजीनामे देणाऱ्या सर्व वरिष्ठ डॉक्टरांची आहे. विशेष म्हणजे राजीनामा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये तात्याराव लहाने यांचं नाव असल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. जे. जे. रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टरांनी एक प्रसिद्ध पत्रक जारी करत राजीनामा देण्यामागील कारण सांगितलं आहे. राजीनामा देणाऱ्या लहाने आणि इतर ८ डॉक्टरांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून त्यात संपूर्ण घटनाक्रम दिला आहे.

सेवानिवृत्तीनंतरही काम करणाऱ्या तात्याराव लहाने यांचे वेतन अधिष्ठातांनी दिला नसून लहाने यांना शासकीय निवासस्थान रिक्त करायला सांगून ७ लाख रुपये दंड ठोठावला, असं पत्रकात म्हटलं आहे. निवासी डॉक्टरांना आमच्याविरोधात भडकावलं जात असून त्यांना भडकवण्यात जे जे रुग्णालयातील अधिष्ठाता यांचा हात असल्याचं तात्याराव लहाने यांनी आरोप केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version