‘बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे’ – नितेश राणे

‘बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे’ – नितेश राणे

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. तर ड्रग्जप्रकरणात देवेंद्र फडणवीसांचाही संबंध असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. यावर मलिकांचा संबंध दहशतवाद्यांसोबत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ९३ दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्यांबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

  भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट केले की, ९३च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं. आता त्यांचाच मुलगा ९३ दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्यांबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगतोय. खरं तर आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे. शिवसैनिक हे करणार का? नाहीतर मीच जाऊन शिंपडतो. असे ट्विट करत नितेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version