केंद्र सरकारने भारतातून जाणारे आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ डिसेंबरपासून भारतातील आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू होण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता. मात्र आता आमिओक्रॉन विषाणूचा धोका वाढल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.
आमिओक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतातून जाणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे तूर्तास स्थगित करण्याचा महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे. तसेच ही उड्डाण सेवा पुन्हा सुरू करण्याची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. येत्या १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा सुरू होणार होती. मात्र आमिओक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता ही सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने रोखला आहे.
या संदर्भात नागरी विमान वाहतून संचालनालयाने (डीजीसीए)ने एक पत्रक जारी केले आहे. कोरोनाच्या आमिओक्रॉन विषाणूमुळे निर्माण झालेली जागतिक परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय उड्डाण स्थगित करण्यात आले आहे. तसेच यानंतर संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उड्डाण सेवा सुरू करण्यात येण्याची तारीख कळवण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.