तुळजा भवानीच्या भाविकांना विम्याचे संरक्षण

तुळजा भवानीच्या भाविकांना विम्याचे संरक्षण

कुलस्वामिनी तुळजा भवानीच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. तुळजा भवानीच्या भाविकांना आता विमा संरक्षण मिळणार आहे.

मंदिर संस्थानच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

तुळजापुर शहरात एखादी दुर्घटना घडली तर मयताला २ लाखाचा विमा मिळणार आहे. तर अपघातातील जखमीला १ लाख रुपये उपचारासाठी मिळणार आहेत.

तुळजा भवानी मंदिर संस्थांन कडून भाविकांचा प्रत्येकी २ लाखाचा विमा दरवर्षी २५ भाविकांना याचा लाभ मिळणार आहे.

पंढरपूर मंदिर संस्थानने हा निर्णय याआधीच घेतलेला आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

या विम्याचा पहिला हप्ता ३ लाख ५१ हजार रुपये विमा कंपनीकडे जमा करण्यात आलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version