Satara SSC Exam : साताऱ्यात शिक्षकाचा अजब कारनामा! दहावीचे पेपर सहावीच्या विद्यार्थिनींकडून तपासून घेतले

सध्या दहावी-बारावीच्या परीक्षादरम्यान पेपरफुटीचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. अशातच सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून शिक्षण व्यवस्थेला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
Satara SSC Exam : साताऱ्यात शिक्षकाचा अजब कारनामा! दहावीचे पेपर सहावीच्या विद्यार्थिनींकडून तपासून घेतले


 

सध्या दहावी-बारावीच्या परीक्षादरम्यान पेपरफुटीचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा, पण याच परीक्षेला आता ‘पेपरफुटीच्या’ वाळवीने पोखरल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून राज्याच्या शिक्षण मंडळाने शर्थीचे प्रयत्न केलेत. मात्र त्यानंतर ही वारंवार पेपर फुटत असल्याच्या घटना समोर येत आहेत.
हेही वाचा- Varun Sardesai: ‘बिल्डर झोपडीधारकांना फसवतात, शासन गप्प का?’; ठाकरे सेनेच्या युवा आमदाराचा विधानसभेत संतप्त सवाल
अशातच सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून शिक्षण व्यवस्थेला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणारे महत्त्वाचे पेपर चक्क सहावीच्या विद्यार्थिनींकडून तपासून घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. फलटण तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. शाळेतील एका शिक्षकाने दहावीच्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासताना सहावीमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींना मदतीला बसवले, असा आरोप केला जात आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आल्याची चर्चा असून त्यामध्ये शिक्षक विद्यार्थिनींसोबत बसून उत्तरपत्रिका तपासत असल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा- Fuel Crisis: इंधन तुटवडा रोखण्यासाठी केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; अमित शहांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन
दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अशा परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतच निष्काळजीपणा झाल्याचा आरोप समोर आल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणाबाबत शाळा प्रशासनाने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता या गंभीर प्रकारावर शिक्षण विभाग नेमकी काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version