Ajit Pawar NCP : DJ, लावणी आणि नृत्य कार्यक्रमांतील अश्लील सादरीकरणावरून राष्ट्रवादीचा सांस्कृतिक विभाग आक्रमक; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे पत्र पाठवण्यात आले आहे.  
Ajit Pawar NCP : DJ, लावणी आणि नृत्य कार्यक्रमांतील अश्लील सादरीकरणावरून राष्ट्रवादीचा सांस्कृतिक विभाग आक्रमक; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाकडून पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे पत्र पाठवण्यात आले आहे.  महाराष्ट्रातील DJ, लावणी व नृत्य कार्यक्रमांमध्ये ‘अश्लील सादरीकरण’ म्हणून कोणत्या कृती ग्राह्य धरल्या जातील, याची स्पष्ट व्याख्या निश्चित करून नृत्य कलाकार, आयोजक व प्रशासनासाठी एकसमान अटी व नियमावली लागू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यात आले आहे.

अश्लील हावभाव, अनावश्यक अंगप्रदर्शन, प्रेक्षकांशी आक्षेपार्ह जवळीक, लहान मुलांचा अशोभनीय कार्यक्रमांमध्ये सहभाग तसेच अश्लील शरीरविक्षेप यांना स्पष्टपणे प्रतिबंध करण्यासाठी शासनाने एकसमान आणि अंमलबजावणीयोग्य नियमावली निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा- Indapur Dance Video : अजितदादांना श्रद्धांजली अन् त्याच व्यासपीठावर नगराध्यक्षांनी ‘माजी म्हणू का’ गाण्यावर धरला ठेका; Video Viral

मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली नेमकं कोणतं सादरीकरण अश्लील मानलं जावं, याची स्पष्ट आणि सर्वमान्य व्याख्या शासनाने निश्चित करावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. या पत्रात अश्लील हावभाव, अनावश्यक अंगप्रदर्शन, प्रेक्षकांशी आक्षेपार्ह जवळीक, अशोभनीय शरीरविक्षेप आणि लहान मुलांचा अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग यांसारख्या बाबींवर स्पष्टपणे निर्बंध आणण्याची मागणी करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कलाकारांना सादरीकरणाचं स्वातंत्र्य असतानाच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक मर्यादांचंही पालन होणं आवश्यक असल्याचं या पत्रातून अधोरेखित करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक कलाकारांच्या समस्या, नाट्यगृहांची स्थिती आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version