Nashik Corporate Jihad Case : "फूस लावून हिंदूचे धर्मांतर, 40 पेक्षा जास्त CCTV…" वेशांतर करून पोलिसांनी केला भांडाफोड; ‘त्या’ आयटी कंपनीत नेमकं काय व्हायचं?

नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये तरुणी आणि महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत.
Nashik Corporate Jihad Case : "फूस लावून हिंदूचे धर्मांतर, 40 पेक्षा जास्त CCTV…" वेशांतर करून पोलिसांनी केला भांडाफोड; ‘त्या’ आयटी कंपनीत नेमकं काय व्हायचं?

नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये तरुणी आणि महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत. मात्र हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने नाशिक पोलिसांनी गोपनीय पद्धतीने तपास केला आहे. यात विशेष म्हणजे नाशिक पोलिस दलातील महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची एक टीम वेशांतर करून कंपनीमध्ये वावरत होती.

सात महिला पोलिसांच्या टीमने सर्व शहानिशा करून हा प्रकार उघडकीस आणला आहे. मीटिंग आणि इतर कामकाज करताना संशयित आरोपी जे अश्लील प्रकार करत होते हे सर्व बघून शिताफीने त्यांना बेड्या ठोकल्या जवळपास 40 पेक्षा जास्त CCTV चेक करून काही ठोस पुरावे गोळा करून ही मोठी कारवाई नाशिक पोलिसांनी केली.

हेही वाचा- Nashik Crime: जबरदस्तीने मांसाहार, लैंगिक शोषण, धर्मांतर…; कॉर्पोरेट कंपनीच्या आड ‘लव्ह जिहाद’चा थरारक कट
नेमकं प्रकरण काय?
नाशिक शहरात एका नामांकित कॉर्पोरेट ऑफिसच्या आड देश हादरवणारा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका व्यावसायिक कार्यालयात नोकरीच्या आमिषाने काही तरुणी आणि युवकांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे आरोप समोर आले आहेत. काम करणाऱ्या काही महिलांशी गैरवर्तन करण्यात आले असून तरुणांवर दबाव टाकून त्याच्यावर अन्याय झाल्याची तक्रारही नोंदवण्यात आली आहे.

या सगळ्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणासंबंधी अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. अद्याप काही जण फरार असल्याने त्यांचा शोध सुरू आहे. तपासादरम्यान आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या युवक-युवतींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version