महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांना व्यावहारिक मराठी येणे बंधनकारक आहे. यासाठी राज्य सरकारने 3 महिन्याची मुदतवाढ दिली होती. दरम्यान आजच या संदर्भात शासन निर्णय जाहीर होणार आहे. मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वाहन चालकांना मराठी येण अनिवार्य झाले आहे. मोटर व्हेहिकल ऐक्ट 1988 मध्ये बदल करून मोटर अमेंडमेंट रूल्स 2026 आज लागू होणार आहे.
या नवीन नियमाप्रमाणे जर रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान नसेल, जुजबी मराठी देखील बोलता येत नसेल तर त्याला आधीच एका महिन्याची नोटीस देण्यात येणार आहे. तसेच त्या एका महिन्यात देखील चालकाने मराठी शिकली नाही, तर त्याचे लायसन्स 3 महिन्याच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येणार आहे.
यानंतर देखील चालक मराठी शिकत नसेल तर त्याचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याची तरदूत जाहीर करण्यात आली आहे. परिवहन विभागातर्फे शासनाच्या विधी आणि न्याय विभागाला कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, तो मंजूर झाल्याने आज शासन निर्णय जाहीर होणार आहे. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठीच्या मोहिमेला आता कायद्याचे संरक्षण देखील मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.