Imtiaz Jaleel: ‘एका व्यक्तीवर आरोप झाले म्हणून संपूर्ण कुटुंब गुन्हेगार…’; मतीन पटेल कारवाईवर इम्तियाज जलील संतप्त

नाशिक लव्ह जिहाद प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपावरून मतीन पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर गंभीर आरोप केले.
Imtiaz Jaleel: ‘एका व्यक्तीवर आरोप झाले म्हणून संपूर्ण कुटुंब गुन्हेगार…’; मतीन पटेल कारवाईवर इम्तियाज जलील संतप्त

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतीन पटेल यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर राजकीय वातावरण तापले असून एमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत प्रशासन आणि सरकारवर गंभीर आरोप केले. नाशिकमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपी आणि फरार असलेल्या निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून मतीन पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, 'एखाद्या व्यक्तीवर आरोप झाले म्हणजे तो दोषी ठरत नाही. मतीन पटेल यांच्यावर आरोप आहेत, पण न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलेले नाही.' त्यांनी सांगितले की, कारवाईनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता आणि लोक संतप्त झाले होते. 'मी स्वतः रात्री त्या भागात गेलो आणि लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. अन्यथा परिस्थिती आणखी चिघळली असती,' असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Sunil Tatkare Meets Sharad Pawar: मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

जलील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचाही उल्लेख केला. 'एका व्यक्तीवर आरोप झाले म्हणून घरातील इतर सदस्यांना गुन्हेगार कसे ठरवू शकतो?' असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येकासाठी घर महत्त्वाचे असते आणि प्रशासनाने कारवाई करताना संवेदनशीलता दाखवली पाहिजे, असेही ते म्हणाले.

या कारवाईवरून त्यांनी सरकारवर दुहेरी निकष लावल्याचा आरोप केला. 'सरकारमधील नगरसेवकांच्या अतिक्रमणांवर अशीच कारवाई होणार का? की आमच्यासाठी वेगळा आणि त्यांच्यासाठी वेगळा न्याय आहे?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात मनपा आयुक्तांना भेटून संबंधित नगरसेवकांनाही नोटिसा देण्यात येणार का, याबाबत विचारणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Jitendra Awhad: …अन् जितेंद्र आव्हाडांची थेट घोड्यावरूनच महापालिकेत एन्ट्री, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनांचा नोंदवला निषेध

या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट करत जलील म्हणाले, 'मी न्यायालयात दाद मागणार आहे. निदा खान माझी नातेवाईक कशी आणि एमआयएमवर करण्यात आलेले आरोप कोणत्या आधारावर आहेत, याचे उत्तरही न्यायालयात द्यावे लागेल.' तसेच, 'माझ्या पक्षातील कोणी चुकीचे करत असेल तर मी त्याचे समर्थन करणार नाही,' असे स्पष्ट करत त्यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतरच पुढील भूमिका स्पष्ट होईल असे सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version