इराण-इस्रायल संघर्षाची धग आता देशातील गॅस शेगड्यांना बसू लागली असून, एलपीजी (LPG) पुरवठ्याचे जागतिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत केलेल्या नाकेबंदीमुळे मध्यपूर्वेतून येणाऱ्या गॅस टँकर्सची सागरी वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. अशातच घरगुती गॅस सिलिंडरच्या दुसऱ्या गॅस बुकींगच्या कालावधीत मोठा बदल करण्यात आला आहे. एक घरगुती गॅस घरात असताना देखील दुसरा गॅस बुक करण्यासाठी नागरिकांना परवानगी असते. हा सिलिंडर 15 दिवसांच्या कालावधीत बुक करता येतो. मात्र सध्या सुरु असलेल्या इराणविरोधात अमेरिका, इस्रायल यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आता पहिला सिलिंडर बुक केल्यानंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी 25 दिवसांचा कालावधीत ठेवण्यात आला आहे. मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमिवर LPG, PNG, CNG, क्रूड ऑइलचा साठा मर्यादीत असल्याने या सगळ्याच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना लेखी आदेश देत व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडर महिनाभरातून एकच देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा- Iran Crisis : भारतावर संकटाचे ढग? 'या' एका संभाव्य धोक्याने अर्थतज्ज्ञांची झोप उडवली; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण
दरम्यान यादरम्यान 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 60 रुपयांनी वाढले आहेत. तसेच 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 115 रुपयांनी वाढली आहे. यादरम्यान मुंबईत, 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,835 पर्यंत वाढली असून दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 836 वरून 913 झाली आहे, तर व्यावसायिक सिलिंडर आता दिल्लीत 1883 मध्ये उपलब्ध होईल. गॅसच्या दरवाढीचा परिणाम केवळ सामान्य जनतेवरच नाही तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यवसायांवरही झाला आहे. तसेच आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ लागणार आहे.
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाने आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि वायूच्या किमती खिळखिळी होण्याची चिन्हे दिसत आहेत. मध्य पूर्वेतील कोणत्याही तणाव किंवा युद्धाचा जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम होतो. दरम्यान मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमिवर भारतात पेट्रोल आणि एलपीजीच्या किमती वाढल्याचे चित्र दिसत आहे. युद्धाच्या झळा भारतातल्या लोकांना बसत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.