‘माझ्यामागे संजय राऊत नावाचा ब्रँड..’

‘माझ्यामागे संजय राऊत नावाचा ब्रँड..’

मुंबई, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. सुनील राऊत यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होते आहे. मला याआधी शंभर कोटींची ऑफर होती आणि आज सुद्धा मला ऑफर आहे. कारण मी स्वतः आमदार आहे. पण माझा ब्रँड संजय राऊत माझ्यामागे असल्यामुळे मला देखील शंभर कोटींची ऑफर आहे, असं वक्तव्य सुनील राऊत यांनी केलेलं आहे. अशा कितीही ऑफर आल्या तरी आम्ही आमचा विचार बदलणार नाही. शंभर कोटी घेऊन माझ्यासारखा निष्ठावंत शिवसैनिक बदलणार नाही, असंही सुनील राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी भाजपासमोर जर गुडघे टेकले असते. तर ते साडेचार महिने जेलमध्ये गेले नसते. पण त्यांना ते कधीही मान्य नव्हतं. ते जेलमध्ये असतानाचे ते साडेचार महिने माझ्या घरच्यांनी कसे काढले आहेत. हे फक्त आम्हालाच माहिती आहे. सगळं काही सहन केलं परंतु आम्ही पक्ष सोडला नाही आणि सोडणारही नाही, असं सुनील राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

आमचीच माणसं विकत घेऊन जातात. आमच्याच माणसांना आमच्यासमोर उभं करतात. मला एकही रुपयाचा फंड सरकारकडून मिळत नाही. माझ्यावर ३५ कोटींचं कर्ज आहे. ३५ कोटींची काम केली पण सरकार मला पैसे देत नाही, असा घणाघाती आरोप सुनील राऊत यांनी शिंदे सरकारवर केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version