MP Hemant Savara : भाजप खासदाराच्या गाडीला भीषण अपघात; घोडबंदर रोडवर डंपरने फॉर्च्युनरला उडवलं

अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
MP Hemant Savara : भाजप खासदाराच्या गाडीला भीषण अपघात; घोडबंदर रोडवर डंपरने फॉर्च्युनरला उडवलं

मुंबई: पालघरचे भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या गाडीला घोडबंदर रोडवर डंपरने धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात सावरा हे सुदैवाने सुरक्षित बचावले असले, तरी त्यांच्या चालकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावरा यांची टोयोटा फॉर्च्यूनर गाडी आणि त्यांच्या ताफ्यातील दुसरी इनोव्हा गाडी विरुद्ध दिशेने प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत फॉर्च्यूनर गाडीच्या पुढील बोनटचा भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला. धडकेनंतर गाडीतील सर्व एअरबॅग्स उघडल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.

अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. जखमी चालकावर तातडीने उपचार करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी दिली आहे. 

हेही वाचा: Ravi Rana: “एकनाथ शिंदेंनी मला ऑफर दिली होती, पण…” आमदार रवी राणांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, डंपर चालकाची चूक होती का किंवा इतर काही कारण आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. अपघात जाणूनबुजून घडवण्यात आला होता का, याचाही तपास केला जात असल्याची माहिती आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुदैवाने हेमंत सावरा या अपघातातून थोडक्यात बचावले असले, तरी भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा: Petrol Diesel Rate Update: केंद्र सरकारचा इंधनावरील कराबाबत मोठा निर्णय; 1 मे पासून डिझेल निर्यातीवरील कर घटवला, पाहा काय आहेत नवे दर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version