छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयाच्या पाहणीमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. रुग्णालयाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत, 14 कोटी रुपये दिले गेले, मग ते गेले कुठे?, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. घाटी रुग्णालयाची अवस्था पाहता घाटीच व्हेंटिलेटरवर आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना कामकाजात तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले. या ठिकाणी घोटाळे करणारे अनेक रॅकेट चालतात का?, असा प्रश्न उपस्थित करत कामामध्ये हलगर्जी करणाऱ्या दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तर 15 दिवसांमध्ये मी माझ्या पद्धतीने कारवाई करणार असून 15 दिवसानंतर तुम्हाला बदल दिसेल. संपूर्ण काम करण्यासाठी पालकमंत्र्यांकडून एका महिन्याची डेडलाईन देण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.