मुंबई :सर्टिफिकेशन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रीन सोल्यूशन्स कंपनीने आपल्या कर्मचारी कल्याण उपक्रमांतर्गत एक प्रेरणादायी पाऊल उचललं आहे. कंपनीच्या 55 कर्मचाऱ्यांना मालवणची सहल घडवून आणत त्यांनी एक वेगळीच उदाहरणं समाजासमोर ठेवली आहे.
ऑफिस असिस्टंटपासून ते टॉप मॅनेजमेंटपर्यंत सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांचा या सहलीत समावेश होता. विशेष म्हणजे संपूर्ण प्रवासासाठी विमान मार्गाची सोय करण्यात आली होती, जे सहलीला एक वेगळंच आकर्षण देत होतं. मालवणच्या निसर्गरम्य किनाऱ्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणांवर ही टीम एकत्र आली, विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यात आल्या आणि विविध टीम-बिल्डिंग अॅक्टिव्हिटीज तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले.
या उपक्रमामागचं मुख्य उद्दिष्ट केवळ कर्मचाऱ्यांना विश्रांती देणं नव्हतं, तर त्यांच्या परिश्रमांचं कौतुक करणं आणि टीममध्ये एकात्मता निर्माण करणं हेही होतं.
कंपनीच्या वाटचालीचा आढावा
2012 साली स्थापन झालेली ग्रीन सोल्यूशन्स कंपनी आज जागतिक स्तरावर पर्यावरणपूरक उपाययोजना, वॉटर ट्रीटमेंट सोल्यूशन्स, लॅबोरेटरी टेस्टिंग आणि पर्यावरणीय सल्लागार सेवा देत आहे. आज या कंपनीचे 1000 हून अधिक आंतरराष्ट्रीय ग्राहक आहेत आणि विविध देशांमध्ये त्यांचं नेटवर्क विस्तारलेलं आहे.
हेही वाचा :वर्ध्यातून हिंदुत्वाचा हुंकार! पश्चिम बंगालच्या अन्यायाविरुद्ध जन आक्रोश मोर्चा
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सागर अहिवळ यांनी या सहलीबाबत सांगितलं, कर्मचाऱ्यांचे योगदान हेच आमच्या यशाचं खरं कारण आहे. ही सहल त्यांच्या परिश्रमांची एक छोटीशी पावती आहे. त्यांनी पुढे असंही सांगितलं की, या उपक्रमामुळे केवळ कर्मचारी कल्याणाचं भान जपलेलं नाही, तर एक सकारात्मक आणि प्रेरणादायक पायंडा घालण्यात आमची टीम यशस्वी ठरली आहे.
सहलीमधून मिळालेला अनुभव
सहलीदरम्यान कर्मचाऱ्यांनी केवळ पर्यटनाचा आनंद घेतला नाही, तर एकमेकांशी संवाद वाढवून सहकार्याची भावना अधिक मजबूत केली. वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून विविध प्रतिभा समोर आल्या. टीम गेम्स, चर्चासत्रं आणि निसर्गात रममाण होणं या गोष्टींनी कामाच्या दडपणातून बाहेर पडून एक नवचैतन्य मिळालं.
कंपनीच्या या उपक्रमाचं सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं जात आहे. कर्मचारी कल्याणासाठी अशा पद्धतीचे उपक्रम हाच भविष्यातील कॉर्पोरेट संस्कृतीचा मार्ग आहे, असं अनेकांनी सांगितलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.