‘जागतिक महिला दिन’ हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी 8 मार्च रोजी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. इंटरनेट सर्च इंजिन असलेलं गुगल आज जगातील सर्वात मोठं प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जातं. गुगलचे विविध डिझाइन्सचे डूडल अनेकांचे लक्ष वेधतात. आज ‘जागतिक महिला दिन’ निमित्त गुगलनं एक खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला आहे.
जागतिक महिला दिनाचं हे गूगल डूडल आर्टिस्ट, अॅलिसा विनान्सद्वारे डिझाइन करण्यात आलं आहे. अॅलिसा विनान्सनं या डूडलबद्दलची भावना देखील व्यक्त केली. तिनं यंदाच्या जागतिक महिला दिनाच्या डूडलबाबत सांगितलं की, आमची यावर्षीची डूडलची थिम ही ‘वुमन सपोर्टिंग वुमन’ ही आहे.
यानिमित्तानं गुगलकडून खास डूडल तयार करण्यात आलं आहे. या डूडलमध्ये एक महिला भाषण करताना दिसत आहे तर काही महिला या आंदोलनात सहभागी झालेल्या दिसत आहे. ग्रह, ताऱ्यांचे निरिक्षण करणाऱ्या महिला देखील या डूडलमध्ये दिसत आहेत. ज्येष्ठ महिला तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी महिला देखील या डूडलमध्ये दिसत आहे. या डूडलवर क्लिक केल्यानंतर स्क्रिनवर महिलांचे हात दिसतील. या हतात निळ्या आणि जांभळ्या रंगाचे झेंडे दिसतात.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.