Hassan Mushrif :’गोकुळ’चे माजी अध्यक्ष शिंदेंच्या संपर्कात पण अचानक राष्ट्रवादीत पक्षप्रवेश; हसन मुश्रीफांच्या खेळीची चर्चा

कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव, कोल्हापुरी चप्पल, कुस्ती आणि बरंच काही. मात्र, यासोबतच कोल्हापुरातील राजकारणही खूप लोकप्रिय आहे.
Hassan Mushrif :’गोकुळ’चे माजी अध्यक्ष शिंदेंच्या संपर्कात पण अचानक राष्ट्रवादीत पक्षप्रवेश; हसन मुश्रीफांच्या खेळीची चर्चा

कोल्हापूर: कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव, कोल्हापुरी चप्पल, कुस्ती आणि बरंच काही. मात्र, यासोबतच कोल्हापुरातील राजकारणही खूप लोकप्रिय आहे. येथील राजकीय नेते एकमेकांवर कुरघोडी करून आपली ताकद दाखवत असतात. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आता नव्या राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक मोठा डाव टाकत शिवसेनेच्या जवळ गेलेले गोकुळचे माजी अध्यक्ष आणि संचालक अरुण डोंगळे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करून घेतले. 

मंगळवारी, मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अरुण डोंगळेंचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश झाला. या पक्षप्रवेशामुळे कोल्हापुरातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोकुळ दूध संघ हा कोल्हापूरच्या राजकारणातील महत्त्वाचा क्रेंद्रबिंदू मानला जातो. गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक पुढील वर्षी पार पडणार असून महायुतीतील सर्व भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रितपणे मैदानात उतरतील. या निवडणुकीत महायुतीचे नेतृत्व हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. अशा स्थितीत अरुण डोंगळे यांचा प्रवेश राष्ट्रवादी कॉंग्रेसाठी मोठा राजकीय लाभ मानला जातो. 

अरुण डोंगळे हे काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आले होते. विधानसभा निवडणुकीत अरुण डोंगळे यांनी प्रकाश अबिटकरांच्या प्रचारात भाग घेतल्याने त्यांचे शिंदे गटाशी संबंध घट्ट झाले. त्यानंतर, अरुण डोंगळे सातत्याने शिवसेनेच्या जवळ जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अरुण डोंगळे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होऊ लागली. मात्र, हसन मुश्रीफ यांच्या राजकीय खेळीमुळे परिस्थिती बदलली आणि अखेर अरुण डोंगळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश केले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version