Ganesh Naik On Pratap Sarnaik : "ज्यांच्यामध्ये भस्मासूर आहे अशा लोकांनी…" गणेश नाईकांची प्रताप सरनाईक यांच्यावर सडकून टीका; नेमकं काय म्हणाले?

वनमंत्री गणेश नाईक यांनी एकाथ शिंदेंवर पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे जोरदार निशाणा साधला आहे. तर वनमंत्री गणेश नाईक यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे.
Ganesh Naik On Pratap Sarnaik : "ज्यांच्यामध्ये भस्मासूर आहे अशा लोकांनी…" गणेश नाईकांची प्रताप सरनाईक यांच्यावर सडकून टीका; नेमकं काय म्हणाले?

वनमंत्री गणेश नाईक यांनी एकाथ शिंदेंवर पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे जोरदार निशाणा साधला आहे. तर वनमंत्री गणेश नाईक यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे. “रिक्षा किती असाव्यात याची नियमावली होती. नगरपालिकेला किती? महापालिकेला किती? पण ज्यांच्या जीवनामध्ये ढोंगीपणा आहे, ज्यांच्यामध्ये बकासुर आहे भस्मासूर आहे अशा लोकांनी रिक्षाचे परवाने इतके दिलेत की रिक्षा उभ्या करायला देखील आता जागा नाहीत.”

हेही वाचा- Buldhana Sanjay Gaikwad: “पण बाई बापासारखं शरीर आणणार कुठून?” टीका करताना संजय गायकवडांची जीभ घसरली; थेट महिलेची तक्रार, गुन्हा दाखल..

“इतक्या रिक्षा झाल्यात की आता रिक्षा चालवणे परवडत नाही शेवटी नियोजन लागतं. पाहिजे त्याला परमिट देण्याच्या धोरणावर” गणेश नाईकांनी टीका केली. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या, ज्यामध्ये मंत्री गणेश नाईक यांनी आक्षेप घेत सौम्य शब्दांत टीका केली आहे. 

तर दुसरीकडे राज्यात धर्म, जात आणि विविध प्रश्नांवरून आंदोलने सुरू असताना वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘काही लोकांनी लावलेल्या आगी आता विझत नाहीत. बाटलीतली भूतं बाहेर काढल्याने ती आता अंगाशी येत आहेत. त्यामुळे काढलेली भुतं पुन्हा बंद करण्याची ताकद ज्याच्यात असेल, त्यांनीच ती बाहेर काढावीत,’ अशी खोचक टीका नाईक यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version