BJP Vs NCP : "काँग्रेसने केलेली चूक भाजपने करू नये" अर्थमंत्रीपदावरून राष्ट्रवादीतील नेत्याचा भाजपला थेट इशारा; महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघाती निधनानंतर महायुती सरकारमध्ये अर्थमंत्रीपदाचा मुद्दा जोरदार चर्चेत आला.
BJP Vs NCP : "काँग्रेसने केलेली चूक भाजपने करू नये" अर्थमंत्रीपदावरून राष्ट्रवादीतील नेत्याचा भाजपला थेट इशारा; महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघाती निधनानंतर महायुती सरकारमध्ये अर्थमंत्रीपदाचा मुद्दा जोरदार चर्चेत आला. राज्यातील महायुती सरकारमध्ये अर्थखात्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात राजकीय वाद उफाळला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे (भाजप) कायम राहिल्याने राष्ट्रवादीने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- Shiv Sena : निवडणूक आयोगाला अधिकार कोणी दिला? ठाकरेंच्या वकीलाचा निवडणूक आयोगाला थेट तो प्रश्न; शिंदेंच्या अडचणीत वाढ

असं असताना राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे अर्थखाते परत देण्याची जाहीर मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला थेट सवाल करत, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सहा महिने उलटूनही अर्थमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे का देण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हे खाते राष्ट्रवादीकडे सोपवण्याचं मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन नेमकं कुठं गेलं, असाही सवाल त्यांनी केला.

तसेच, सुनेत्रा पवार यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची चूक काँग्रेसने केली होती, तीच चूक भाजपने करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. याबाबत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी तसेच आमदार-खासदारांनी भाजपकडे ठामपणे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अर्थमंत्रीपदाचा तिढा कसा सुटणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version