NCP Sunetra Pawar: ‘वर्षा’वरील बैठकीनंतर राष्ट्रवादीत हालचाली वाढल्या; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत तातडीची बैठक

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. अशातच सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची एक तातडीची बैठक पार पडली.
NCP Sunetra Pawar: ‘वर्षा’वरील बैठकीनंतर राष्ट्रवादीत हालचाली वाढल्या; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत तातडीची बैठक

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. अशातच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील महत्त्वाचे नेते एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत निवासस्थानी ‘वर्षा’वर पोहोचल्याने विविध राजकीय तर्कांना उधाण आले आहे.

या भेटीमुळे आगामी राजकीय घडामोडी, आघाड्यांचे संभाव्य बदल आणि नव्या समीकरणांबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या कोट्यातून आणखी एक बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या वर्षावरील बैठकीनंतर सुनेत्रा पवारांची अचानक तातडीची बैठक पार पडली. 

हेही वाचा- Maharashtra Politics: जयंत पाटील, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अचानक 'वर्षा'वर; फडणवीसांसोबत बंद दाराआड चर्चा, राजकीय तर्कांना उधाण

दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे म्हटले जाते आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्ष पदाची निवड रद्द करण्याची मागणी करण्यात आली. अशातच आज मुंबईत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची एक तातडीची बैठक पार पडली. ही बैठक तब्बल एक तासांपासून सुरु होती.

या बैठकीला बैठकीला छगन भुजबळ, सुनील तटकरे, अनिल पाटील, पार्थ पवार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला आव्हान देणाऱ्या पत्रबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. तसेच वर्षा बंगल्यावर जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीबाबतही चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्याचसोबत जयंत पाटील सोबत आल्यास मंत्रिपदाचं वाटप कशा पद्धतीने करायचं? यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीत अत्यंत संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version