फडणवीस यांच्या प्रतिवादानंतर औषध विक्रेत्याची सुटका

फडणवीस यांच्या प्रतिवादानंतर औषध विक्रेत्याची सुटका

रेमेडिसीविर औषधाचा पुरवठादार असलेल्या ब्रुक फार्मा या कंपनीच्या पदाधिकाऱ्याला बेकायदा घरातून उचलून नेण्याचे प्रकरण शनिवारी रात्री उघडकीस आले. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी ब्रुक फार्मा कंपनीकडून महाराष्ट्रासाठी ५० हजार रेमेडिसीविर औषध कुपी मिळवल्या होत्या. मात्र, विरोधकांच्या मागणीनुसार पुरवठा केल्याचा राग मनात ठेवत राजेश जैन यांना मुंबई पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेऊन त्यांची १० तास चौकशी केली. असा दावा फडणवीस यांनी केला असून ते स्वतः शनिवारी रात्री नागपूर येथून परतताच थेट पोलिसांसमोर जाऊन बसले.

‘ब्रुक फार्मा औषध कंपनीच्या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेणे बेकायदेशीर आहे’, असा प्रतिवाद देवेंद्र फडणवीस यांनी पुलिस उपायुक्तांसोबत केला आणि त्यांनी या प्रकाराबाबत खुलासा मागितला.देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी शनिवारी रात्री आंदोलन केले. अखेर पोलिसांना राजेश जैन यांना सोडून द्यावे लागले.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version