Beed Municipal Council : विरोधक शांत, सत्ताधारीच भिडले! बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष – उपनगराध्यक्षांमध्ये जुंपली, पाहा व्हिडीओ

Beed Municipal Council : विरोधक शांत, सत्ताधारीच भिडले! बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष – उपनगराध्यक्षांमध्ये जुंपली, पाहा व्हिडीओ

बीड : बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यातील सुप्त संघर्ष पेटलेला असतानाच, आता चक्क मंजुरीसाठी आलेल्या ठरावात फेरबदल केल्याच्या कारणावरून स्वच्छता सभापती आणि उपनगराध्यक्ष यांच्यात सभागृहातच जोरदार खडाजंगी रंगली. विरोधक शांतपणे या अंतर्गत नाट्याचा आनंद घेत असताना, सत्ताधाऱ्यांच्याच गोंधळामुळे पालिकेची सभा मात्र चांगलीच गाजली. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू होती. मात्र, अजेंड्यावरील एका अत्यंत महत्त्वाच्या ठरावाचे वाचन होत असताना उपनगराध्यक्षाच्या हे लक्षात आले की, मूळ ठरावातील मजकुरात परस्पर बदल करण्यात आला आहे. या बदलाचा रोख थेट नगराध्यक्षाच्या दिशेने गेल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण तयार झाले. 

हेही वाचा : Abhijeet Dipke: ‘तुम्ही 10 वर्षात केलं काय?’; सरकारी शाळांची अवस्था पाहून अभिजीत दीपकेंनी केली ‘या’ मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

आमच्या परवानगीशिवाय आणि विषय समितीला अंधारात ठेवून ठरावात फेरबदल करण्याचे धाडस झालेच कसे?, असा थेट सवाल उपनगराध्यक्षांनी केला. यावरून स्वच्छता सभापतीही आक्रमक झाले आणि दोघांमध्ये शब्दाला शब्द वाढून शाब्दिक चकमक उडाली. नेमक्या याच मुद्द्यावरून एकाच पक्षातील लोकप्रतिनिधी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याच्या आविर्भावात आल्याने काही काळ सभागृहात प्रचंड गदारोळ माजला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version