Eknath Shinde offered Bacchu Kadu : एकीकडे शिंदेंकडून ऑफर, तर दुसरीकडे रवी राणा यांच्यासोबत फोनवरून चर्चा; राजकीय चर्चांना उधाण

एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिली असताना या प्रकरणात नवीन घडामोड समोर आली आहे.
Eknath Shinde offered Bacchu Kadu : एकीकडे शिंदेंकडून ऑफर, तर दुसरीकडे रवी राणा यांच्यासोबत फोनवरून चर्चा; राजकीय चर्चांना उधाण

एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बच्चू कडू हे शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून जाण्याची शक्यता वर्तावली जात आहे. बच्चू कडूंनी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केल्यास आत्ता आमदारकी आणि सहा महिन्यांनी मंत्रीपद शिवसेनेकडून बच्चू कडू यांना मिळू शकते. दरम्यान आता आमदारकी दिल्यास बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश करावा मात्र सध्या पक्ष विलीन करू नये. जेव्हा मंत्रिपद मिळेल तेव्हा पक्ष विलीन करावा प्रमुख पदाधिकाऱ्यांची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे. हाच प्रस्ताव बच्चू कडू बैठकीत देण्याची शक्यता सूत्रांची माहिती आहे.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिली असताना या प्रकरणात नवीन घडामोड समोर आली आहे. एकमेकांचे कट्टर वैरी असलेले बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. रवी राणा आणि बच्चूकडू यांच्यात काय चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यात आहे. तर रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version