ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या 32 व्या महापौर वर्षा मॅरेथॉनला यंदा विक्रमी प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध वयोगटांतील 30 हजारांहून अधिक धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही धावपटूंमध्ये सहभागी होत मॅरेथॉनमध्ये धाव घेतली.या मॅरेथॉनचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी काही अंतर धावपटूंसोबत धावत सर्वांना प्रोत्साहन दिले. शिंदे धावत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
यंदाच्या स्पर्धेत 21 किलोमीटरच्या मुख्य शर्यतीसह महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही स्वतंत्र गट ठेवण्यात आले होते. पहाटेपासूनच ठाण्याच्या रस्त्यांवर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान, ठाण्यातील कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी दौऱ्यावर रवाना झाले. तेथे शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहण्याबरोबरच खासदार बंडू जाधव यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमालाही ते हजेरी लावणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.