Dhule Dondaicha Election : ऐतिहासिक निवडणूक! दोंडाईचा राज्यातील पहिली नगरपालिका; नगराध्यक्षांसह सर्व 26 उमेदवार बिनविरोध

राज्यात पहिली नगरपालिका जिथे नगराध्यक्षसह 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली.
Dhule Dondaicha Election : ऐतिहासिक निवडणूक! दोंडाईचा राज्यातील पहिली नगरपालिका; नगराध्यक्षांसह सर्व 26 उमेदवार बिनविरोध

तुषार परदेशी, प्रतिनिधी

धुळे : राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांना धुळे जिल्ह्यातील जवळपास 70 हजार लोकसंख्या असलेल्या दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेची निवडणूक पूर्णत: बिनविरोध करण्यात यश आले असून नगराध्यक्षांसह एकूण 13 प्रभागातील सर्व 26 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपाच्या विरोधात वेगवेगळ्या प्रभागातून शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार , एमआयएम व समाजवादी पार्टी अपक्ष अशा विविध  पक्षांकडून उमेदवार उभे करण्यात आले होते. पंरतू या सर्वांनी माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्याने दोंडाईचा नरगपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच  बिनविरोध झाली आहे.

हेही वाचा : Malegaon Election : माळेगावात अजितदादांची कट्टर विरोधक तावरे गटाशी युती, संतप्त निष्ठावान कार्यकर्त्यांची थेट बंडखोरी

दरम्यान, 1952 साली स्थापन झालेल्या दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद निवडणूक प्रथमच बिनविरोध पार पडली आहे. दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत गेल्या 40 वर्षापासूनचा संघर्ष बाजूला सारून डॉ. हेमंत देशमुख गटाला भाजपावासी करण्यात मंत्री जयकुमार रावल यांना यश आले. त्यानंतर रणनिती आखून मंत्री रावल यांनी सुरुवातीला नगराध्यक्ष नयनकुंवरताई रावल व 7 जागा बिनविरोध करण्यात यश मिळविले होते. पंरतू माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरीत सर्व 19 जागांवरील भाजपाच्या उमेदवारांना बिनविरोध करण्यात यश मिळविले आहे. दोंडाईचा नगरपरिषद बिनविरोध झाल्याने रावल यांचे राजकीय वर्तुळातील महत्त्व अधोरेखीत झाले आहेत. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच विरोधकांनी माघार घेतल्याने दोंडाईचा नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. दोंडाईचा नगरपरिषद बिनविरोध झाल्यानंतर रावल गढीसह दोंडाईचा शहरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. जयकुमार रावल यांना भाजपेयींनी डोक्यावर घेतले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version