Dilip Walse Patil: "…म्हणून मी साहेबांची साथ सोडली आणि" वळसे पाटलांकडून खरं कारण उघड; राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचे खरे कारण उघड केले आहे.
Dilip Walse Patil: "…म्हणून मी साहेबांची साथ सोडली आणि" वळसे पाटलांकडून खरं कारण उघड; राजकीय वर्तुळात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्षांतरामागे विकासाचे कारण पुढे केले होते. मात्र, शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचे खरे कारण उघड केले असून, त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. डिंभे ते माणिकडोह या 16 किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित बोगद्यावरून आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे.

या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटलांनी आपल्या राजकीय भूमिकेचा उलगडा केला. विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि माझ्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत हा वादग्रस्त बोगदा कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. हा बोगदा रद्द व्हावा आणि शेतकऱ्यांचे पाणी वाचावे, म्हणूनच आपण शरद पवार यांच्यापासून दूर होऊन अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- Bharat Gogawale : 'आमच्या नेत्यांबद्दल बोलणार असेल तर आम्हीही रस्त्यावर उतरू…, हा रायगडच्या मावळ्याचा इशारा; गोगावले जरांगेंवर बरसले

यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "मी आता सोमवारी, मंगळवारी कधीही शक्य होईल त्यावेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन. मी वरिष्ठ सर्व नेत्यांसोबत बोललो आहे. त्यानंतर मी माझी भूमिका काय घ्यायची ते ठरवेन. हा एखादा राजकारणाचा प्रश्न नाही हा निवडणुकीचा प्रश्न तर अजिबात नाही. विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि माझ्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत हा वादग्रस्त बोगदा कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता."

"डिंभे धरणातून निघणारा बोगदा रद्द करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता, केवळ आणि केवळ त्या एका शब्दासाठी मी साहेबांची साथ सोडली, आणि अजित पवारांसोबत आलो. त्यावेळेस लोक बोलले हे केवळ मतांसाठी आणि निवडणुकीपुरते हे बोलत आहे. मात्र, आज वास्तव सर्वांसमोर उभे ठाकले आहे. उगाच लोक निवडून देत नाही. आपण ज्यावेळेस लोकांच्या कल्याणाचा विचार करतो. त्यावेळेस लोक आपल्याला निवडून देतात." असा थेट आणि खळबळजनक खुलासा वळसे पाटलांनी केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version