Gopichand Padalkar : एकीकडे मराठ्यांचं भगवं वादळ, दुसरीकडे धनगर समाजाचा एल्गार! महाराष्ट्रातील राजकारण तापलं; सरकारची भूमिका काय?

मराठा आरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. तर आता धनगर आरक्षणाचा देखील मुद्दा तापताना दिसतो आहे.
Gopichand Padalkar : एकीकडे मराठ्यांचं भगवं वादळ, दुसरीकडे धनगर समाजाचा एल्गार! महाराष्ट्रातील राजकारण तापलं; सरकारची भूमिका काय?

मराठा आरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. तर आता धनगर आरक्षणाचा देखील मुद्दा तापताना दिसतो आहे. एकीकडे, मनोज जरांगेंकडून मराठा कुणबी आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसंदर्भात उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर धनगर समाजाकडून देखील मागण्यांना जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर आज धनगर समाजाकडून राज्यव्यापी आक्रोश आंदोलनं जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयात पार पडणार आहेत. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी 12 वाजता आक्रोश आंदोलन केले गेले असून आमदार गोपीचंद पडळकर मुंबईतील आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला आहे.

यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले की,”धनगर समाज शांततेने निवेदन देतोय धनगर समाजाच्या अस्मितेचा विषय आहे त्यासाठी धनगर समाज संघर्ष करतोय. दुर्दैवने धनगर समाजाची अंमलबजावणी झाली नाही. आमचा खासदार निवडून येत नाही सत्तेत वाटा नाही तहसीलदार किंवा इतर अधिकारी मध्ये टक्के कमी आहे. आज जमिनी सुपीक झाल्या तिकडे मेंढपाळणा येता येत नाही. सरकारकडे मागणी आहे धनगर समाजाच्या आरक्षण चा प्रश्न मार्गी लावा. आरक्षणची सोडवणूक करून दिली पाहिजे. अहिल्यादेवी प्रबोधन मंच हे न्यायालयात लढत होत.”

हेही वाचा- Manoj Jarange Patil Maratha Reservation: …तर 10 मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडणार! जरांगेंच्या डोक्यात नेमकं चाललंय काय? सरकारला दिला थेट इशारा

“सुप्रिम कोर्टात ही मागणी फेटाळली होती. 18 तारखेला पुन्हा तारीख आहे. निवेदन सर्वीकडे लोक देत आहेत. चर्चगेट स्टेशनला नाव आहे अहिल्यादेवीच पुतळा आहे तिकडे चर्चगेटला अहिल्यादेवीच नाव द्यायला पाहिजे ही मागणी आहे. इंग्रज्यांच्या विरोधात खूप लोक लढली त्यात सिंरोबा धनगर होते त्यांचा सन्मान कधीचा झाला नाही कनेटिंग लिंकला त्यांच नाव देण्यात यावं. संत बाळूमामा देवस्थान चा पंढरपूर चा जो स्वातंत्र्य कायदा आहे तसा आणावा समिती चा अध्यक्ष मेंढपाळ असायला पाहिजे.”

“मी जरी सरकारमध्ये असलो तरी धनगर समाजाची भूमिका मी मांडतो याची जबाबदारी आहे. मी समाजाच्या सोबत आहे. Mpsc चे विद्यार्थी माझ्या संपर्कत आहेत विद्यार्थी ज्यांनी पेपर फोडला त्यांना अरेस्ट केलंय कठोर शासन करण्यात आलंय यांना इमेज बिल्ड करायची आहे तो विषय मांडला तर विषय गावागावात जाईल हे त्यांना माहिती आहे. 18 तारखेला केस लागणार आहे सरकारने ताकद लावावी  सुप्रीम कोर्टात दगा फटका झाला तर आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र भर फिरून लोकांना गोळा करुन तीर्व आंदोलन कराव लागेल.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version