Gangakhed Nagar Panchayat Results: धनंजय मुंडेंच्या बहिणीचा विजय; कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे यांनी गंगाखेड नगरपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला असून, बहिणीच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी स्वतः मुंडे गंगाखेडमध्ये दाखल झाले आहेत.<br/>
Gangakhed Nagar Panchayat Results: धनंजय मुंडेंच्या बहिणीचा विजय; कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

Gangakhed Nagar Panchayat Results: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी दिग्गज नेत्यांनी कंबर कसली असताना, गंगाखेडमधून धनंजय मुंडे यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे यांनी गंगाखेड नगरपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला असून, बहिणीच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी स्वतः मुंडे गंगाखेडमध्ये दाखल झाले आहेत.

बहिणीचा विजय, भावाचा जल्लोष!

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उर्मिला केंद्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांचा विजय निश्चित होताच गंगाखेडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. धनंजय मुंडे यांनी केवळ या विजयाचे अभिनंदनच केले नाही, तर ते स्वतः विजयोत्सवात सहभागी झाले. विशेष म्हणजे, गंगाखेडमध्ये एका बाजूला उर्मिला केंद्रे यांनी बाजी मारली असली, तरी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत काँग्रेस उमेदवाराने घेतलेली आघाडी चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा – Ratnagiri Election Result 2025: कोकणात महिलाराज..! रत्नागिरीत 4 पैकी 3 नगरपरिषद तर तिन्ही नगरपंचायतीवर महिला नगराध्यक्ष

कुठे राष्ट्रवादीचा जोर, तर कुठे भाजपला धक्का

परभणी जिल्ह्यातील 7 नगरपालिकांच्या निकालांनी संमिश्र चित्र उभे केले आहे. सेलू नगरपालिकेत जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. येथे काँग्रेसने आपली ताकद दाखवत भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

हेही वाचा – Pune Nagar Parishad Election Results: बालेकिल्ला शाबूत ! पुण्यात 'दादां'चीच हवा; 17 पैकी 10 जागांवर राष्ट्रवादीची गुढी

अजित पवार गटाची मुसंडी 

सोनपेठ आणि मानवत नगरपालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर असून, जिल्ह्यावर पकड मजबूत करण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. तथापी, जिंतूरमध्ये भाजपने आपली आघाडी टिकवून ठेवली आहे, तर बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनेही जिल्ह्यात पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version