Dhananjay Munde: आता कमबॅक होणार, राजकीय वर्तुळात कोणतं वादळ येणार?, धनंजय मुंडेंचा व्हिडिओ चर्चेत…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार धनंजय मुंडे काही दिवसांपासून राजकारणातून अलिप्त होते. परंतु नुकताच त्यांनी सोशल मीडियावर जीममधील वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ शेअर केला.
Dhananjay Munde: आता कमबॅक होणार, राजकीय वर्तुळात कोणतं वादळ येणार?, धनंजय मुंडेंचा व्हिडिओ चर्चेत…

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार धनंजय मुंडे काही दिवसांपासून राजकारणातून अलिप्त होते. परंतु नुकताच त्यांनी सोशल मीडियावर जीममधील वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ शेअर केला. ज्यावर कॅप्शन म्हणून एक सूचक कविता दिली असून ती चर्चेचा विषय बनली आहे. ही कविता विरोधकांना त्यांच्या होणाऱ्या कमबॅक विषयी सांगत आहे. धनंजय मुंडे यांनी इन्स्टा पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे… भेगाळलेले पाय आणि घायाळ मन; अजूनही धैर्य टिकवून आहे… निंदा-दूषणे आता न भिडती, अडखळत मार्ग काढतोच आहे… हरवण्याची आता बिशाद कुणाची… स्वतःशी सुद्धा लढतो आहे’…, असे  म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

2024 साली विधानसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी वाल्मिक कराड याचे नाव समोर आले होते. त्यामळे धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड टीका झाली असून धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रि‍पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली होती. धनंजय मुंडे यांचे राजकारणात होणारे पुनरागमन लांबणीवर पडले होते. मात्र त्यांची ही पोस्ट विरोधकांना सतर्कतेचा सूचक ईशारा आहे का?  राजकारणात कोणते नवीन डावपेच घेऊन येणार आहेत? हे पाहण्यासारखे आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version