मोठी बातमी! मोदींचा वारसदार म्हणून फडणवीसांना उपपंतप्रधान बनवावं? संघाच्या गोटात हालचाली; राऊतांचा गौप्यस्फोट

मोठी बातमी! मोदींचा वारसदार म्हणून फडणवीसांना उपपंतप्रधान बनवावं? संघाच्या गोटात हालचाली; राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई : एक बडा नेता लवकरच उपपंतप्रधान होणार आहे. मोदींचा वारसदार म्हणून या व्यक्तीला उपपंतप्रधान बनवावं, असं संघाच्या गोटात घटत आहे. त्यामुळेच मोदी सरकारचा विस्तार रखडला आहे, असा पुनरोच्चार ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्देशून म्हटले आहे. फडणवीस यांना उपपंतप्रधान करण्याचा संघाचा आग्रह असल्याचे संजय राऊत यांनी नमूद केले आहे. लवकरच त्याबाबची माहिती समोर येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राऊतांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा केला. पीएम इन वेटिंग असलेले लोक कधीच पंतप्रधान होत नाहीत, असा या देशाचा इतिहास आहे. आणि सध्या तरी देशात पंतप्रधान पदासाठी कोणतीच व्हॅकन्सी नाहीये, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत दिली होती. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी हा गौप्यस्फोट केला.

हेही वाचा : Marathwada Bandh: जरांगेंच्या उपोषणानंतर मराठवाडा पेटला; परभणी-लातूरमध्ये शाळांना सुट्टी, 5 जिल्ह्यांत कडकडीत बंद

दरम्यान, राऊत यांनी चार मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबतही मोठा खुलासा केला आहे. संजय राऊत म्हणाले की, फडणवीस यांना दिल्लीत बोलावणार आणि मोठी जबाबदारी देणार आहेत. संघाच्या आतल्या गोटातील माहितीनुसार, मोदी मंत्रिमंडळात नसलेल्या आणि दिल्लीत कार्यरत नसलेल्या एका महत्त्वाच्या नेत्याची उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. मोदींचा वारसदार म्हणून जी व्यक्ती येणार आहे, त्या व्यक्तीला आधी उपपंतप्रधान करावं, अशी संघाची भूमिका आहे. संघाच्या गोटात तसं घटत आहे. मी तुम्हाला जी माहिती देतोय, ही माहिती लवकरच समोर येईल, असा दावा राऊत यांनी केला.

तसेच देशात पंतप्रधान पदाची आणि गृहमंत्रीपदाची व्हॅकन्सी आहे. फडणवीस यांना माहीत नसेल तर मी त्यांना माहिती देऊ शकतो. सध्या देशात पंतप्रधान पदाच्या वेटिंगमध्ये अमित शाहच आहेत. या देशाचा गृहमंत्रीपदावर राहिलेली व्यक्ती पंतप्रधान झाल्याची माहिती नाही. सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. अमित शाह हे प्राईम मिनिस्टर इन वेटिंग असं ते मानतात. लोक मानत नाही. ते पंतप्रधान होणार नाही. दुसरे राजनाथ सिंह आहे. त्यांच्याबद्दल साशंकता आहे, असेही राऊत यांनी पुढे नमदू केले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version