काँग्रेसला मोठा धक्का; लवकरच संग्राम थोपटे करणार भाजपमध्ये प्रवेश

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन घडामोडी होत आहेत. नुकताच काँग्रेसमधील एक जेष्ठ नेता भाजपात प्रवेश करणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
काँग्रेसला मोठा धक्का; लवकरच संग्राम थोपटे करणार भाजपमध्ये प्रवेश

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन घडामोडी होत आहेत. नुकताच काँग्रेसमधील एक जेष्ठ नेता भाजपात प्रवेश करणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माहितीनुसार, लवकरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. त्यासोबतच, संग्राम थोपटे काँग्रेसला सोडून भाजपात प्रवेश करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे आणखी काही मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमधून आणखी कोणी भाजपात सामील होणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

पुण्यामध्ये, जर ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडली, तर काँग्रेसला मोठे नुकसान होईल. आश्चर्याची बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही काँग्रेसचा हात सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र, आता ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे यांनी थेट भाजपात प्रवेश करून चर्चांना नवीन दिशा दिली आहे. शुक्रवारी, संग्राम थोपटे यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक कोणत्या कारणासाठी आहे, हे अजून गुपित आहे. सूत्रांनुसार, 22 एप्रिल 2025 रोजी संग्राम थोपटे भाजपात प्रवेश करतील.

कोण आहेत ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे?

संग्राम थोपटे हे भोर, रायगड आणि मुळशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. या मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. भोर मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला आहे आणि येथे त्यांची मोठी ताकद आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून त्यांचे वडील आणि माजी शिक्षणमंत्री अनंतराव थोपटे तब्बल सहा वेळा निवडून आले होते. त्यामुळे, जर संग्राम थोपटे भाजपात प्रवेश करतात, तर भाजपला याचा मोठा फायदा होईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version