बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त परवानगी

बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त परवानगी

बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनवाणीदरम्यान बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल ७ वर्षांनी राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मुकूल रोहतगी यांनी या प्रकरणात राज्य सरकारची बाजू मांडली. या निर्णयानंतर बैलगाडा मालकांनी आनंद व्यक्त केला. चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. मात्र, आता ही बंदी उठवण्यात आली आहे.

मात्र बैलगाडा शर्यती आयोजित करताना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. नियमांच्या चौकटीत राहून शर्यतीचे आयोजन करावे लागेल. पशू क्रूरता प्रतिबंधक कायद्यातंर्गत नियमांचे पालन करणे आयोजकर्त्यांना बंधनकारक असणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला परवानगी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी जल्लोष व्यक्त केला. कोल्हापुरात हलगी घुमक्याच्या ठेक्यावर बैलगाडा चालक मालक आणि शेतकऱ्यांनी जल्लोष व्यक्त केला असून बैलगाडा चालक मालकांमध्ये  आनंदाचे वातावरण आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version