Abhijeet Dipke CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना मारहाण; गर्दीचा फायदा घेतला अन्…

देशातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वादग्रस्त ठरलेल्या 'नीट' (NEET) वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित घोटाळ्याचा आणि गैरव्यवहाराचा मुद्दा सध्या देशभरात पेटला आहे.
Abhijeet Dipke CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना मारहाण; गर्दीचा फायदा घेतला अन्…

देशातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वादग्रस्त ठरलेल्या ‘नीट’ (NEET) वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित घोटाळ्याचा आणि गैरव्यवहाराचा मुद्दा सध्या देशभरात पेटला आहे. या गंभीर मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी आक्रमक झालेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) सध्या संपूर्ण देशात प्रचंड चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावरून सुरू झालेली ही चळवळ आता थेट रस्त्यांवर उतरली असून, पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी नवी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन केल्यानंतर पुण्यात विद्यापीठात मोठे आंदोलन केले. त्यानंतर देशभरातील अनेक ठिकाणी आंदोलन करणार असल्याची घोषणा दिपके यांनी केली.

हेही वाचा- RE-NEET पेपर लीकच्या नावाखाली मोठी फसवणूक; अहमदाबाद क्राईम ब्रांचने राजस्थानमधून दोन सायबर ठगांना ठोकल्या बेड्या

त्यानुसार अभिजीत दिपके यांनी राजधानी दिल्लीनंतर आता जयपूरमध्ये आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. आंदोलन सुरू असताना एका अज्ञात तरुण गर्दीत घुसून, गर्दीचा फायदा घेऊन अभिजीत दीपके यांच्या जवळ गेला आणि त्याने त्यांच्या कानशि‍लात लगावली.

या घटनेनंतर अभिजीत यांच्या समर्थकांनी तात्काळ संबंधित तरुणाला पकडले आणि त्याला मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी धावपळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version