Nana Patole: मुख्यमंत्र्यांच्या मामेबंधूंच्या बिनविरोध विजयानंतर राजकारण तापले; नाना पटोले यांचा हल्लाबोल

चिखलदरा येथील बिनविरोध निकालावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे.
Nana Patole: मुख्यमंत्र्यांच्या मामेबंधूंच्या बिनविरोध विजयानंतर राजकारण तापले; नाना पटोले यांचा हल्लाबोल

मुंबई: अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे मुख्यमंत्र्यांचे मामेबंधू बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निकालावर गंभीर आरोप करत भाजपवर सत्तेचा दुरुपयोग केल्याचे म्हटले आहे. नाना पटोले म्हणाले, “मुख्यमंत्री काही दिवसांपूर्वी रवी राणा यांच्या विजयाचं कौतुक करत होते, पण चिखलदरा येथे त्यांच्या मामेभावांचा बिनविरोध विजय हा लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह आहे.

कोणतीही स्पर्धा न होता निवडणूक होणे कितपत योग्य आहे? लोकांवर दबाव आणून मते मागितली जात आहेत का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “भाजप बाहुबली पद्धतीने काम करत आहे. विरोधकांना धमकावून बिनविरोध निकाल मिळवणे हा सत्तेचा स्पष्ट दुरुपयोग आहे. राज्यातील लोकशाही धोक्यात आली आहे.”

हेही वाचा: Maharashtra Farmer News: केळीला कवडीमोल दर, शेतकरी अडचणीत; पण शहरातील परिस्थिती मात्र उलट

आल्हाद कलोती यांची प्रतिक्रिया

या सर्व आरोपांवर मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले “देवेंद्र फडणवीस यांना हा प्रदेश अतिशय परिचित आहे. चिखलदऱ्याच्या विकासासाठी सातत्याने काम करणाऱ्यांना लोकांनी स्वतःहून पाठिंबा दिला. म्हणूनच आम्हाला बिनविरोध विजय मिळाला. हा विजय कोणत्याही दबावाचा परिणाम नाही. हा लोकांचा स्पष्ट जनादेश आहे.”

भाजपने या वादावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र चिखलदऱ्यातील बिनविरोध निकाल आणि काँग्रेसची टीका यामुळे हा राजकीय मुद्दा आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा: Pimpri Chinchwad Election : मतदार यादीत मोठ्या चुका! 1261 मतदारांची नावंच नाहीत, मतदारांच्या प्रभागांमध्येही बदल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version