CM Devendra Fadnavis : राहुल गांधींना पंतप्रधान मोदींवरील टीकेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले, ‘राहुल गांधी हे रिजेक्टेड माल…’

CM Devendra Fadnavis : राहुल गांधींना पंतप्रधान मोदींवरील टीकेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले, ‘राहुल गांधी हे रिजेक्टेड माल…’

नवी दिल्ली : सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोनं, पेट्रोल, इंधन इत्यादींच्या वापराबाबत सांगितलेल्या सूचनांवरून प्रतिक्रिया उमटत आहेत. सोने खरेदी करू नका, पेट्रोल-इंधन कमी वापरा या वक्तव्यावरून राजकीय क्षेत्रातील नेत्यांकडून विविध विधाने येत आहेत. अशातच काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी मोदींच्या या विधानांना त्यांच्या नेतृत्वाचे अपयश असे म्हटले आहे. राहुल गांधींच्या याच प्रतिक्रियेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना राहुल गांधी हे रिजेक्टेड नेता असल्याचे संबोधले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज, सोमवारी दिल्ली येथे वार्षिक बिझनेस समिटसाठी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मोदींनी जे सांगितलं त्याचा अर्थ राहुल गांधींना समजला नाही. तर त्याचा दोष मोदींना देता येत नाही. कुठेतरी त्यांची समजचं कमी आहे. पण तो जनतेला कळलाय. त्यामुळे जनता प्रतिसाद देईल. देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत. रिजेक्टेड माल आहे. त्यांना तुम्ही महत्त्व देता, आम्ही देत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा : Rahul Gandhi : ‘हे उपदेश नव्हे तर अपयशाचे पुरावे’; पंतप्रधान मोदींच्या त्या सात आवाहनांवर राहुल गांधींचा हल्लाबोल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version