शिवरायांच्या किल्ल्यांचं पावित्र्य अभंग राहील, सरकारकडून स्पष्टीकरण

शिवरायांच्या किल्ल्यांचं पावित्र्य अभंग राहील, सरकारकडून स्पष्टीकरण

पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र काही किल्ले हेरिटेज हॉटेलात रूपांतरित करण्याचा विचार करत आहे. मात्र याला दुर्गप्रेमी, शिवप्रेमी तसंच विरोधक कडाडून विरोध करत आहेत. यासंदर्भात सरकारकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण देण्यात आलंय.

संबंधित बातमी- महाराष्ट्रातले गड-किल्ले मिळणार भाड्याने!

गडकिल्ल्यांसंदर्भात सरकारकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण  

राज्यात वर्ग 1 आणि वर्ग 2 असे दोन प्रकारचे किल्ले आहेत.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात.

वर्ग 1 चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात.

केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील.

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल.

मात्र वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात.

त्यांचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळं म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे.

त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं स्पष्टीकरण देण्यात आलंय. एका वर्तमानपत्राच्या बातमीच्या आधारे कृपया चुकीचे अर्थ काढण्यात येऊ नयेत, असंही सांगण्यात येतंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version