डिसेंबर २०२१ पर्यंत किमान सर्व प्रौढांचं लसीकरण करण्यासाठी भारत सक्षम असल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केला आहे. देशातील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी हा दावा केला आहे.
ऑगस्ट आणि डिसेंबर २०२१ च्या दरम्यान भारताला २१६ कोटी कोरोनाचे डोस उपलब्ध होणार आहेत,अशी माहितीही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी यावेळी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.