‘कांजूर इथं कारशेड व्यवहार्य नाही’

‘कांजूर इथं कारशेड व्यवहार्य नाही’

आरे जंगलात उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडला महाविकास आघाडीने विरोध दर्शवला होता आणि हा प्रकल्प कांजूरमार्ग इथं हलवण्यात आला होता. पण, कांजूरमार्गमध्ये हा प्रकल्प हलवणे हे वेळखाऊ आणि व्यवहार्य नाही, अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.

किरीट सोमय्यांनी आरे जंगलामध्ये मेट्रो कारशेड हलवण्याबद्दल माहितीच्या अधिकारातून माहिती मागवली होती. त्यांच्या या माहितीला एमएमआरडीएने उत्तर दिले आहे. ‘कांजूर कारशेड एकापेक्षा अधिक मेट्रोसाठी वापरणे व्यवहार्य नाही. असं उत्तर सोमय्यांच्या पत्रावर एमएमआरडीएने दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने मेट्रो कारशेड कांजूरमध्ये करण्याचा निर्णय, चुकीचा होता अशी चर्चा रंगू लागली आहे. कांजूर कारशेड एकापेक्षा जास्त मार्गासाठी वापरणं व्यवहार्य नाही. कांजूर शेड एकाचा मार्गासाठी वापरावं असं अहवालात म्हटलं होतं. किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, कांजूर कारशेड बाबत ठाकरे सरकारने गंडवलं. महाआघाडी सरकारने कारशेड कांजूरला नेण्यासाठी जिद्द केली होती. तीन वेगवेगळ्या मेट्रो लाइनचं कारशेड होईल असं म्हटलं होतं. तेव्हा तत्कालीन सरकारने दिशाभूल केली होती असा आरोपही सोमय्या यांनी केला.

राज्यात सत्तांतरानंतर झालेल्या पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारने मेट्रो कारशेडबाबत घेतलेला निर्णय़ बदलला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, “मेट्रो ३ कारशेड आरेमध्येच होईल. आरेमध्ये ज्या जागी मेट्रो कारशेडचं २५ टक्के काम झालं आहे तिथेच १०० टक्के काम होईल. हेच मुंबईचं हित आहे कारण यामुळे मेट्रो लवकर सुरू होईल.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version